औरंगाबाद : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राजकारणात सध्या राजकारण्यांचा बाजार झाला आहे. अशी माहिती अखिल भारतीय सेनेच्या आशा अरुण गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली
महाराष्ट्रात फक्त जालना जिल्हा येथे अखिल भारतीय सेनेच्या वतीने उमेदवार देण्यात आला आहे. इतर कोणत्याही ठिकाणी त्यांनी उमेदवार दिला नाही. जालना येथे आज अशा गवळी यांची सभा होणार आहे. त्यामुळे त्या आज औरंगाबाद येथे आल्या असता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत जालना येथील उमेदवार गणेश सानूळे हे देखील उपस्थित होते. आशा गवळी पुढे म्हणाल्या की सध्या राजकारणात पुढार्यांना निष्ठा राहिली नाही. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून पुढारी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत.
आमचा पक्ष सर्वत्र निवडणूक लढवणार होता मात्र सर्वच पक्ष अरुण गवळी यांना अडचणी निर्माण करतात. एक प्रकारे सर्व पक्ष मिळून आमच्यावर दबाव निर्माण करतात. त्यामुळे मी स्वतः किंवा आमच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करता आले नाहीत. आज पर्यंत आम्हाला खोट्या केसेसमध्ये अडकविण्याचे काम प्रत्येक सरकारने केले आहे. मराठवाड्याचा समस्या मला माहिती आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी मराठवाड्यात उमेदवार दिला आहे. मराठवाड्यात पाणी ही मोठी समस्या आहे. त्याबरोबरच तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे आम्ही सोडणारच असे त्यांनी सांगितले. दरम्यान, भारतीय जनता पार्टी कडून अखिल भारतीय सेनेच्या गवळी यांना महायुतीत येण्यासाठी निमंत्रण होते. पुढील विधानसभा निवडणुकीत त्यावर आम्ही विचार करणार आहोत. आज आम्हाला सोबत घेऊन निवडणुका जिंकाल पण उद्या आम्हाला दूर केले तर काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे सर्व विषयावर चर्चा करूनच आम्ही भाजप सोबत जाऊ.